Home बातम्या भूकंपातील मृतांची संख्या ५०

भूकंपातील मृतांची संख्या ५०

0

परवा संध्याकाळी ईशान्य व उत्तर भारतातील राज्यांत आलेल्या भूकंपात मृत्यू पावलेल्यांची संख्या ५० झाली आहे. यात सिक्कीममधील २३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने मार्ग बंद झाले असून त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत.

पश्‍चिम बंगालमध्ये सहाजण तर बिहार, नेपाळ, तिबेट येथे प्रत्येकी सात जण मृत्यू पावल्याचे वृत्त आहे. शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले असून विविध ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भूकंपामुळे प्रचंड आर्थिक हानी झाली आहे.लष्कराने ऑपरेशन मदतमोहिम हाती घेतली असून २ हजार जवान मदतकार्यात गुंतले आहेत.