भाषा मंचच्या सभेसाठी फोंड्यात दुचाकींवरून कार्यकर्त्यांची मिरवणूक

0
47

भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या युवा कार्यकर्त्यांची मिरवणूक काल संध्याकाळी फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरासमोरून काढण्यात आली. सुमारे १०० हून अधिक दुचाक्यांचा मिरवणुकीत समावेश होता.
निरंकाल, शिरोडा, पंचवाडी, बोरी व रात्री फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी दि. ८ मे रोजी शिरोडा येथे होणार्‍या जाहीर सभेची तयारी जोरात सुरू असून सुमारे ६ हजार लोकांना निमंत्रणे देण्यात आली असल्याचे सांगितले. ३ हजार पेक्षा जास्त लोक जाहीर सभेला उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. भाजपाने २०१२ साली दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता अद्याप केली नाही. त्यामुळे भाभासुमंचचे आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलनाचे राजकारण करू देणार नसल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.