भारत-विंडीज दुसरी कसोटी आजपासून

0
105

हैदराबाद
भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पुन्हा तंदुरुस्त ठरलेला कर्णधार जेसन होल्डर व वेगवान गोलंदाज किमार रोच यांच्या समावेशामु्‌ळे विंडीजचा संघ अधिक समतोल बनला आहे. पहिल्या कसोटीतील टुकार कामगिरीमुळे सुनील अंबरिसचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. किमो पॉलने गोलंदाजीत सपाटून मार खाल्लेला असला तरी तळात उपयुक्त धावा त्याने केल्या होत्या. पदार्पणाच्या कसोटीत शर्मेन लुईसने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे रोच व होल्डर यांना सामावून घेण्यासाठी विंडीज कोणाचा बळी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे भारताने कसोटीच्या पूर्वसंध्येला १२ सदस्यीय संघाची घोषणा करताना पहिल्या कसोटीसाठी निवडलेला संघच कायम ठेवला आहे. त्यामुळे मयंक अगरवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. अंतिम ११ मध्ये कुलदीपच्या जागी शार्दुलला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
भारत संभाव्य ः पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी व कुलदीप यादव.
वेस्ट इंडीज संभाव्य ः क्रेग ब्रेथवेट, कायरन पॉवेल, शेय होप, शिमरॉन हेटमायर, रॉस्टन चेज, जेसन होल्डर, शेन डावरिच, किमार रोच, शर्मेन लुईस, देवेंद्र बिशू व शेन्नन गेब्रियल.