भारत-अमेरिका दरम्यानच्या महत्त्वपूर्ण करारांवर सहमती

0
144

>> ट्रम्प यांचे पत्रकार परिषदेत सुतोवाच

भारत-अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक व्यवहाराला अंतिम रूप मिळाले असून या अंतर्गत आपाचे आणि एमएच-६० रोमिओ या जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टर्ससह अद्ययावत लष्करी सामग्री खरेदीच्या ३ अब्ज डॉलर्स रकमेचा करार उभय देशांदरम्यान होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी उभय देशांदरम्यानच्या ऊर्जा, वित्त व अन्य क्षेत्रातील प्रस्तावित करारांविषयीही सुतोवाच केले.

आपल्या या दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी काल उभय देशांदरम्यान झालेल्या उच्चस्तरीय चर्चांमध्ये अंमली पदार्थ, नार्को दहशतवाद व अन्य संघटीत गुन्हेगारी या विषयांवर मात करण्याबाबतच्या गोष्टींवर सहमती झाली असे ट्रम्प म्हणाले.

सीएए, दिल्लीतील हिंसाचार
भारताचा अंतर्गत मामला
भारतात नव्याने आलेल्या सीएए कायदा तसेच सध्या दिल्लीत झालेला हिंसाचार या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी पत्रकारांनी सीएएवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना केली. सीएएद्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरोपही ट्रम्प यांनी फेटाळला. भारतात असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दलही त्यांनी मोदी यांची प्रशंसा केली.