Home Featured भारतीय हद्दीत विदेशी ट्रॉलर्सना बंदीची मागणी

भारतीय हद्दीत विदेशी ट्रॉलर्सना बंदीची मागणी

0

गोयच्या रापोणकारांचे एकवोट आणि राष्ट्रीय मच्छीमारी कामगार मंचने भारतीय सागरी हद्दीत विदेशी मच्छीमारी ट्रॉलरना मासे मारण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. वरील संघटना पारंपरिक मच्छीमाराच्या हिताचे जतन करण्यासाठी वावरत असून त्यांनी भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात वरील प्रश्‍नी दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे. या संघटनांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानाही निवेदन सादर केले आहे. केंद्र सरकारने पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी एन एफ एफ चे सरचिटणीस ओकेन्सीयो सिमोयश यांनी केली आहे.