भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘तारागिरी’ दाखल

0
17

>> माझगाव येथे युद्धनौकेचे दिमाखात जलावतरण

भारतीय नौदलात तारागिरी या तिसर्‍या युद्धनौकेचा समावेश झाला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे काल रविवारी तारागिरीचे जलावतरण करण्यात आले. ५०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्प १७- कार्यक्रमांतर्गत सात युद्धनौका बांधण्यात येणार आहेत. यातील चार युद्धनौका एमडीएल आणि तीन गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स सुधारित स्टिल्थ वैशिष्ट्‌यांसह बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने दिली. तारागिरी ही युद्धनौका एकात्मिक बांधणी पद्धत वापरून बांधण्यात आली आहे. तारागिरीची पायाभरणी १० सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आली होती.

वैशिष्ट्‌ये

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या तारागिरी या युद्धनौकेचे वजन ३५१० टन असून तिची रचना भारतीय नौदलाच्या इन-हाउस ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. १४९ मीटर लांब आणि १७.८ मीटर रुंद जहाज दोन गॅस टर्बाइन्स आणि दोन मुख्य डिझेल इंजिनच्या संयोजनाद्वारे समर्थित असेल. याचा टॉप स्पीड २८ नॉट्स (सुमारे ५२ किमी प्रतितास) असेल. ही नौका ताशी ५९ किमी वेगाने समुद्राच्या लाटांना भेदून धावू शकते. या स्वदेशी युद्धनौकेवर ३५ अधिकार्‍यांसह १५० लोक तैनात केले जाऊ शकतात. तारागिरी स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे.