भारतीयांचा योग्य सन्मान करा

0
109

>> केंद्राचा व्हॉट्‌सऍप सीईओंना इशारा

व्हॉट्सऍपने आपल्या नव्या सेवा शर्ती जाहीर करत त्या ८ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांत त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अनेकांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्हॉट्‌सऍपने आपला निर्णय लांबणीवर टाकला. मात्र, आता केंद्राने व्हॉट्सऍपच्या भारतातील सीईओंना यावरून खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात भारत जागतिक पातळीवर व्हॉट्सऍपचे घर असून व्हॉट्सऍपसाठी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तरीही व्हॉट्सऍपची सदर पॉलिसीबाबत करण्यात आलेले एकांगी बदल स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्तावित बदल मागे घेण्याबरोबरच गोपनियता, वापरकर्त्यांच्या आवडीचे स्वांतत्र्य आणि माहिती याबद्दल पुनर्विचार करावा. भारतीयांचा योग्य सन्मान करायला हवा असा इशारा दिला आहे.

व्हॉट्सऍपने नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल सूचना देताना, तुम्हाला जर व्हॉट्सऍपचा वापर यापुढेही करायचा असेल तर तुम्हाला नवीन नियम आणि अटी स्वीकारणे अनिवार्य आहे किंवा तुम्ही व्हॉट्सऍपचा वापर थांबवू शकता, असे दोनच पर्याय व्हॉट्सऍपने दिले. त्यामुळे गोपनिय माहिती सार्वजनिक होण्याची भीती व्यक्त केली जात होती. तसेच सर्व गोमाहितीही यामुळे उघड होण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने व्हॉट्‌स्‌ऍपला वरील इशारा दिला आहे.