भारतासाठी सोपा ‘ड्रॉ’

0
185

थॉमस व उबेर कप बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी काल सोमवारी गटवारी जाहीर झाली असून या दोन्ही स्पर्धांच्या किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त झाली आहे.

डेन्मार्कमधील आरहस येथे ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. क्वालालंपूर येथे झालेल्या ‘ड्रॉ’ समारंभामध्ये थॉमस कपसाठी भारताचा यजमान डेन्मार्क, जर्मनी व अल्जेरियासह ‘क’ गटात समावेश करण्यात आला आहे. उबेर कपसाठी भारतीय महिलांना ‘ड’ गटात चीन, फ्रान्स व जर्मनीसह ठेवण्यात आले आहे. चारही गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत.

भारतापेक्षा कमी मानांकित देशांचा भारताच्या गटात समावेश असल्याने भारताला दोन्ही विभागांत उपांत्यपूर्व फेरीची वाटचाल सोपी जाणार आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाला आपले सुधारित वेळापत्रक सुरू करण्यात आलेल्या अडचणी पाहता ऑक्टोबरमध्ये होणार्‍या या दोन प्रमुख स्पर्धांबद्दल अजूनही आयोजकांना खात्री देता आलेली नाही.

गटवारी
थॉमस कप ः अ गट ः इंडोनेशिया, मलेशिया, इंग्लंड, नेदरलँडस्, ब गट ः चीन, तैवान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, क गट ः भारत, डेन्मार्क, जर्मनी, अल्जेरिया, ड गट ः जपान, थायलंड, कोरिया, कॅनडा. उबेर कप ः अ गट ः जपान, तैवान, स्पेन, इजिप्त, ब गट ः कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, क गट ः थायलंड, डेन्मार्क, कॅनडा, स्कॉटलंड, ड गट ः चीन, भारत, फ्रान्स व जर्मनी.