भारताने थेट आमच्यासोबत चर्चा करावी ः तालिबान

0
32

पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा देश नसून भारताने थेट आमच्यासोबत चर्चा करावी, असे आवाहन तालिबानचा ज्येष्ठ नेता मुल्ला अब्दुल सलाम जईफ याने केले आहे. आम्ही सुपरपॉवर असणार्‍या अमेरिकेसमोरही झुकलो नाही, त्यामुळे पाकिस्तानसमोर झुकण्याचा प्रश्नच नसल्याचे त्याने यावेळी म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरोधात वापर होईल, अशी भीती भारताला वाटत असेल, तर भारताने थेट तालिबान सरकारसोबत चर्चा सुरू करावी.

पाकिस्तानच नव्हे, तर इतर कुठल्याही देशाला आम्ही आमच्या भूमीचा इतर कारवायांसाठी वापर करू देणार नाही असे जईफ याने म्हटले आहे. दरम्यान, तालिबानचे हे अंतरिम सरकार असून नव्या सरकारमध्ये महिलांना स्थान देण्याबाबत गांभिर्यानं विचार सुरू असल्याचे तालिबानने म्हटले आहे.