नेतृत्व नसल्यानेच कॉंग्रेसला गळती ः सिब्बल

0
40

>> कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

पंजाबमधील राजकीय घडामोडीनंतर आता कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात दोन गट समोरासमोर आले आहेत. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्षपदाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करताना कॉंग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती नाही अशी टीका केली. पक्षाला नेतृत्व नसल्याने कॉंग्रेसला गळती लागली असल्याचे वक्तव्यही यावेळी सिब्बल यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्याची मागणीदेखील केली आहे.

दरम्यान, कपिल सिब्बल यांच्या या विधानावरून कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सिब्बल यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी निषेधाचे फलकही झळकावले. त्यामुळे येत्या काही दिवसात कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

अजय माकन यांची सिब्बलांवर टीका
कॉंग्रेस नेते अजय माकन यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका करताना संघटनात्मक पार्श्वभूमी नसताना सोनिया गांधी यांनी कपिल सिब्बल यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद दिले. पक्षात सर्वांचे ऐकले जाते. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब करण्याच प्रयत्न करू नका असा सल्ला दिला.