भारताने विमानसेवा सुरू करावी, अफगाणिस्तान सरकारचे पत्र

0
30

भारत आणि अफगाणिस्तादरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, असे अफगाणिस्तान सरकारने भारत सरकारला पत्र पाठवले आहे. अफगाणिस्तानच्या विमान वाहतूक खात्याचे मंत्री हमीदुल्लाह अखुनजादा यांनी भारताच्या विमान उड्डाण खात्याचे महासंचालक अरुण कुमार यांना पत्र पाठवून ही विनंती केली आहे. भारताने या पत्राला अद्याप उत्तर दिलेले नाही मात्र विमानसेवा सुरु करण्याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू असल्याचे म्हटले आहे. १५ ऑगस्टला अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर भारत सरकारने अफगाणितानला जाणारी सर्व उड्डाणे बंद केली होती. केवळ अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी विमाने पाठवण्यात येत होती.