भारतात आणखी एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता

0
110

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपत्कालीन वापर म्हणून भारतात मान्यता मिळाली आहे.