भारताचे नेतृत्व श्रीजेशकडे

0
78

>>चॅम्पियन्स चषक हॉकी

दि. १० ते १७ जून या कालावधीत होणार्‍या एआयएच चँपियन्स चषक हॉकी स्पर्धेत १८ सदस्यीय भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व गोलरक्षक पी. आर. श्रीजेश करील. ही स्पर्धा रिओ ऑलिंपिकपूर्व असल्याने भारतीय पुरुष हॉकी संघ निवड समितीने कणर्ंधार सरदार सिंग आणि निष्णात ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंग या ज्येष्ठ खेळाडूना विश्रांती दिली.
गेल०या काही काळापासून सतत खेळत असल्याने सरदारला विश्रांती दिली. अझलन शाह चषक स्पर्धेत श्रीजेंशला विश्रांती देण्यात आली होती आणि आता सरदारला विश्रांती दिली आहे, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.
संघ : पी. जे. श्रीजेश (कर्णधार), विकास दहिया , प्रदीप मोर, व्हीआर रघुनाथ, कोठाजीत सिंग, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, दानिश मुजतबा, चिंगलेनसाना सिंग, मनप्रीत सिंग, एस.के. उथप्पा, देविंदर वाल्मिकी, हरजीत सिंग, तलविंदर सिंग, मनदीप सिंग, एसव्ही सुनील (उपकर्णधार), आकाशदीप सिंग, निक्कीन थिमय्या.