पार्से युथ क्लब क्रिकेट विजेता

0
80

केरी येथील श्री आजोबा स्पोटर्‌‌स ऍण्ड कल्चरल क्लब आयोजित स्व. राहूल केरकर ब्रदर्स कप, आठ षटकांच्या अखिल गोवा पंचायत मर्यादित टेनिस बॉल (हार्ड) क्रिकेट स्पर्धेत बोडगेश्वर संघ, म्हापसा संघाचा पराभव करून पार्से युथ संघ, पार्से संघाने स्पर्धेचे विजेतेपदाचे रु. १ लाख रु. व आकर्षक चषक पटकाविला. सदर बक्षीस योगेश केरकर, राहूल घाटगे व अजय सिंग यांनी पुरस्कृत केले होते.

आजोबा मंदिरनजीकच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत १८ संघांनी भाग घेतला होता. उपविजेत्या संघास रोख रु. ५० हजार व चषक तसेच उपंत्य ङ्गेरीतील पराभूत दाभोलकर ब्रदर्स, मोरजी व आरोंदा युथ, आरोंदा संघांना रोख व चषक देण्यात आले. वैयक्तिक बक्षिसे- मालिकावीर भाऊ (बोडगेश्वर), सामनावीर रामा नागवेकर (पार्से), उत्कृष्ट ङ्गलंदाज सदानंद (बोडगेश्वर), उत्कृष्ट झेल संजय तळकर (केरी), उत्कृष्ट गोलंदाज अमीर साळगावकर (पार्से) यांना देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे श्रीनिवास साळूके, कोल्हापूर, टोल विरोधी समितीचे निमंत्रक तर सन्माननीय पाहुणे पेडणेचे माजा आमदार दयानंद सोपटे, सरपंच यशवंत नार्वेकर, युवा उद्योजक सचिन परब, युवा उद्योजक स्वप्नील तळकर, न्यू इंग्लिश हायस्कूलचे चेअरमन उल्हास केरकर, निवृत्त पोलीस अधिकारी नारायण सोपटे केरकर, साबांखाचे अभियंते मणीराज तळकर, युवा उद्योजक संतोष कोरकणकर, कोल्हापूरचे माजी नगरसेवक दिलीप माने, लक्ष्मण पोतदार, आजोबा क्लबचे व्यवस्थापक योगेश केरकर, क्लबचे अध्यक्ष संजय तळकर, पुरस्कर्ते अजय सिंग, राहूल घाटगे (कोल्हापूर) उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास साळुके, दयानंद सोपटे, सचिन परब, संतोष कोरकणकर यांची भाषणे झाली.
उपविजेत्या संघाने स्व. राहूल केरकर यांच्या कुटुंबियास रोख वीस हजार रुपये, युवा उद्योजक सचिन परब यांनी रोख रु. ५० हजार रुपये व आयोजक आजोबा स्पोटर्‌‌स क्लबने आयोजनाच्या माध्यमातून शिल्लक रक्कम स्व. राहूल केरकर यांच्या कुटुंबियास प्रदान केली.