भारताचा विजयी ‘षटकार’

0
112
विजयानंतर रैना व धोनी.

रैना बरसला, धोनीही तळपला
सामनावीर सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जिगरबाज खेळ्यांच्या जोरावर टीम इंडियाने विश्‍व चषक ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेचा ६ गडी राखून पराभव केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं षटकार खेचीत टीम इंडियाचा सलग सहावा विजय साकारला.
टीम इंडियाच्या या झुंजार विजयाचा शिल्पकार ठरलेल्या, शतकवीर सुरैश रैनाने ११० धावांची जिगरबाज खेळी करतानाच कर्णधार धोनीच्या (नाबाद ८५) सुरेख सहयोगात पाचव्या यष्टिसाठी १९६ धावांची भागीदारी नोंदवित भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब गटातील सर्व सहाही लीग सामने जिंकून अव्वल स्थान राखलेल्या भारताची गाठ येत्या गुरुवार दि. १९मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार्‍या उपांत्यपर्व फेरीत बांगलादेशशी पडेल.
झिम्बाब्वेविरुद्धचा हा औपचारिकतेचा सामना भारत आरामात जिंकेल अशी अपेक्षा होती. पण झिम्बाब्वेतर्फे निरोपाचा सामना खेळलेल्या ब्रँडन टेलरच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर त्यानी २८८ धावांचे तगडे आव्हान खडे केले आणि बहरातील भारतीय संघाला विजयासाठी अगदी ४९व्या षटकापर्यंत झुंजवले. भारताची ४ बाद ९४ अशी स्थिती बनली होती आणि सामन्याचं पारडं झिम्बाब्वेच्या दिशेने झुकल्यासारखंही वाटत होतं. परंतु, रैना आणि धोनीनं संयत आणि आक्रमक अशा सुरेख संगमात सामन्याचे चित्रच पालटून टाकलं. अर्थात, रैनाला मिळालेली जीवदानंही टीम इंडियाला ङ्गळली. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रॅन्डन टेलरने तडाखेबंद खेळीत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करताना १५ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीनं त्यानं ११० चेंडूत १३८ धावा तडकावल्या. सिन विल्यम्सने त्याला योग्य साथ देताना ५० धावा केल्या. झिम्बाब्वे तिनशेचा टप्पा ओलांडणार असे वाटत होते पण पण मोहित शर्मानं मधली ङ्गळी आणि मोहम्मद शामी – उमेश यादवनं शेपटाला झटपट गुंडाळल्यानं २८७ धावांवर त्यांचा डाव आटोपला. सहाही सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना बाद करीत ६० विकेट घेण्याचा पराक्रमही गोलंदाजांनी केला.