भाजप सरकारच्या कारभारचा आम आदमी पक्षाकडून निषेध

0
2

आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी क्रांती दिनी भाजपच्या पणजीतील कार्यालयावर काल मोर्चा नेऊन भाजप सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा निषेध केला. आम आदमी पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते यांनी आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करत गोवा मुक्ती संग्रामाचे नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून ह्या मोर्चाला सुरुवात केली. आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, गोवा प्रभारी ॲड. अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी आम आदमी पक्षाचा हा मोर्चा भाजप कार्यालयाच्याजवळ अडविला. यावेळी आपच्या नेत्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘मोफत पाणी’ योजना रद्द केल्याबद्दल भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. ही योजना कधीच सामान्य लोकांना मदत करण्यासाठी नव्हती. भाजपने ही योजना घाईघाईत आणली होती, असे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.