भाजप संसदीय मंडळावरून अडवाणी, जोशी यांना वगळले

0
102

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने भाजप संसदीय मंडळावरून पक्षाचे संस्थापक असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना वगळण्यात आले आहे. संसदीय मंडळावर आता अडवाणी व जोशी यांच्या जागी शिवराजसिंग चौहान व जे. पी. नड्डा यांची वर्णी लावली आहे.
भाजपची त्रिमूर्ती मानले जाणार्‍या अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची वर्णी आता पाच सदस्यीय मार्गदर्शक मंडळावर लावण्यात आली आहे.
भाजपच्या नव्या संसदीय मंडळाची फेरचना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. चौहान व नड्डा यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीवरही घेण्यात आले आहे. फेररचित भाजप संसदीय मंडळावरील सदस्य असे- अध्यक्ष अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, अनंतकुमार, भावरचंद गेहलोत, शिवराज सिंग चौहान, जगत प्रकाश नड्डा व भाजपचे वरीष्ठ नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेनंतर अमित शहा यांनी अडवाणी, जोशी यांना बाजूला सारले आहे. पाच सदस्यीय मार्गदर्शक मंडळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी व राजनाथ सिंग यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रीय राजकारणात नसले तरी त्यांना एनडीच्या अध्यक्षपदी ठेवण्यात आले आहे.रामलाल.