भाजप राजवटीत अल्पसंख्यकांवर हल्ले : कॉंग्रेस

0
103

केंद्रात व विविध राज्यांत भाजप सत्तेवर आल्यापासून देशातील अल्पसंख्यकांवर व विशेष करून ख्रिस्ती धर्’ियांवर हल्ल्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला.कॉंग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, की हरियाणात चर्चवर हल्ले होऊ लागले असून तेथील चर्चचा क्रॉस तोडून टाकणार्‍यांनी तेथे हिंदू देव हनुमान यांची मूर्ती नेऊन ठेवण्याचे कृत्य केले. पश्‍चिम बंगालमध्ये एका ७२ वर्षीय वृद्ध माद्रीवर सामूहिक बलात्कार केला गेला. या अशा घटना घडत असताना सरकारकडून अशी कृत्ये करणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे ते म्हणाले. समाजसेवेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या मदर तेरेझा यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बदनामकारक आरोप केले. राजघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द गाळण्यात यावा अशी मागणी शिवसेनेकडून होऊ लागलेली आहे. ख्रिस्तींचा प्रमुख सण असलेल्या नाताळची सुटी रद्द करून केंद्र सरकारने तो सुप्रशासन दिन जाहीर केला. आता २ ऑक्टोबर या गांधी जयंतीदिनाची सुट्टी रद्द करण्याचा डाव आखण्यात आला असल्याचे ते म्हणाले.