भाजप-मगो युतीवर ३ ऑक्टोबर नंतर चर्चा

0
79

>> गोवा प्रभारी नितीन गडकरींचे आज आगमन

 

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तथा पक्षाचे गोवा प्रभारी नितीन गडकरी यांचे आज गोव्यात आगमन होत आहे. मात्र, भाजप-मगो युतीच्या विषयावर त्यांच्या सध्याच्या गोवा भेटीत चर्चा होणार नसून ३ ऑक्टोबर नंतरच त्यावर चर्चा होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल सांगितले.
श्री. गडकरी यांची आज पक्षाचे आमदार व कोअर गटाचे सदस्य यांच्या बरोबर बैठक होईल. आजच्या बैठकांमध्ये ते येथील संपूर्ण राजकीय परिस्थितीचा आढावा घेतील. उद्या शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी ११.३० वाजता येथील ङ्गिदाल्गो हॉटेलमध्ये चाळीसही मतदारसंघांचे गटाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी बैठक होणार असल्याचे तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षाने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला शंभर टक्के प्रतिसाद
मिळाल्याचे सांगून येत्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने जनतेचा कौल असेल, असा दावा त्यांनी केला. कॉलेज कॅम्पसमध्ये वायङ्गाय सुविधा उपलब्ध करून देणे व दरमहा शंभर मिनिटांचे विद्यार्थ्यांना मोबाईल टॉकटाईमचे कार्ड वितरित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पक्षाने स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे दीनदयाळ विमा आरोग्य योजनेचा सरकारी
कर्मचार्‍यांनाही लवकर लाभ मिळवून देण्याची सोय करावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.
२ ते ४ ऑक्टोबर या काळात राज्यातील १६२८ मतदान केंद्रांपैकी १५०४ केंद्रांवर ‘स्वच्छ गोवा नितळ गोंय’ मोहिमेसाठी कार्यकर्ते जनजागृती करतील, असेही त्यांनी सांगितले. त्यात महिला, युवा, सर्व कार्यकर्ते सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
पक्षाने उत्तर गोवा जिल्ह्यासाठी ङ्ग्रँकी कार्व्हालो, शंकर चोडणकर, अरुण बांदकर, देमू गावकर व आनंद हळर्णकर यांची तर दक्षिण गोव्यासाठी आशिष करमली, उल्हास नाईक तुयेकर व सुरेश केपेकर यांची प्रवक्तेपदी निवड केल्याची माहिती तेंडुलकर यांनी दिली.