भाजप पदाधिकाऱ्यांशी आशिष सूद यांची चर्चा

0
5

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासमवेत पक्षाच्या गाभा समितीची बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी मंत्री नीलेश काब्राल, माजी खासदार नरेंद्र सावईकर, दामू नाईक, संजीव देसाई, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते. बैठकीत उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांविषयी चर्चा करण्यात आली, असे तानावडे यांनी सांगितले.