भाजपमध्ये या; सर्व खटले बंद करू

0
20

>> भाजपने ऑफर दिल्याचा मनीष सिसोदिया यांचा आरोप

भाजपमध्ये प्रवेश केल्यास आपल्यावरील सीबीआय, ईडीचे सर्व खटले बंद करण्यात येतील, अशी ऑफर भाजपने दिली असल्याचा धक्कादायक आरोप काल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्याकडे त्यांना देण्यात आलेल्या ऑफरबाबतचे भाजपचे कॉल रेकॉर्डिंग असल्याची माहिती आपच्या सूत्रांनी दिली.

काल ट्विट करत सिसोदिया यांनी हा आरोप केला. माझ्याकडे भाजपचा संदेश आला आहे. आप सोडून भाजपमध्ये सामील व्हा. सीबीआय, ईडीची सर्व प्रकरणे बंद होतील. मात्र, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचे, ते करा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.