भाजपच्या 11 खासदारांचे राजीनामे सादर

0
2

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 21 खासदार उभे केले होते. त्यापैकी 12 खासदार निवडणूक जिंकले, तर 9 पराभूत झाले.
12 विजयी खासदारांपैकी 11 खासदारांनी बुधवारी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला. केवळ राजस्थानमधून निवडणूक जिंकलेल्या बालकनाथ यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.

मध्य प्रदेशातील नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप आणि रीती पाठक हे संसदेचे सदस्यत्व सोडले आहे. अरुण साओ, रेणुका सिंह आणि गोमती साई हे छत्तीसगडचे, तर राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि किरोडी लाल मीणा या राजस्थानमधील खासदारांनी संसदेचे सदस्यत्व सोडले आहे.
ज्या खासदारांनी राजीनामा दिला आहे, ते संसदेचे सदस्यत्व सोडून विधानसभेचे सदस्यत्व घेतील. त्या आमदारांना पक्ष मंत्रिपद देऊ शकतो किंवा काहींना मुख्यमंत्री पद सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.