भाजपकडून पुन्हा अपमानीत होण्याची मगोची तयारी नाही

0
94

>> दीपक ढवळीकर यांचा टोमणा

 

भाजपकडून आणखी अपमान करून घ्यायची आमची तयारी नाही. भाजपने आमची हकालपट्टी केली आणि आता तेच आमच्यासाठी दारे खुली ठेवण्यात आली असल्याचे सांगत आहेत. त्यांचे वरील वक्तव्य पाहून आश्‍चर्य वाटते असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल सांगितले. भाजपची हुकूमशाही मगो सहन करू शकत नसल्याचे ढवळीकर म्हणाले.
गोवा सुरक्षा मंचबरोबर युती करणार का, असे विचारले असता त्याविषयी ठोस असे काही सांगण्याचे त्यांनी टाळले. मात्र, युतीसाठी त्यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा झाल्याचे ते म्हणाले. देशी भाषांतून शिक्षण हे गोसुमंचे एकमेव धोरण आहे. त्याबाबतीत मगोचा त्यांना पाठिंबा आहे. पण मगोची अन्य कित्येक धोरणे असल्याचे ते म्हणाले. निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत असून ती झाली की मगो पुढे काय करायचे ते ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.