Home बातम्या भंडारी समाज संस्थेवरप्रशासकांची नियुक्ती

भंडारी समाज संस्थेवरप्रशासकांची नियुक्ती

0

राज्य सरकारने राज्यातील भंडारी समाजातील दोन गटांतील वादाच्या पार्श्वभूमीवर भंडारी समाज संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांना सहा महिन्यात भंडारी समाज संस्थेची निवडणूक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. यासंबंधीची आदेश राज्य सरकारच्या कायदा विभागाने 4 मार्च 2026 रोजी जारी केला आहे. राज्यातील भंडारी समाजसंस्थेतील दोन गटांतील वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन्ही गटाच्या प्रमुखांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या बाजू जाणून घेतल्यानंतर भंडारी समाज संस्थेवर सहा महिन्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भंडारी समाज संस्थेच्या एका गटाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.