कठोर कारवाईची मागणी
अखिल गोवा भंडारी सामजाच्या काल झालेल्या तातडीच्या बैठकीत आमदार विष्णु सुर्या वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. सरकारने या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाने केली, अशी माहिती अध्यक्ष अनिल होबळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने कारवाई न केल्यास लवकरच बैठक घेऊन पुढील कृती कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधीवर हल्ला होऊनही सरकार कारवाई करीत नसेल तर सर्वसामान्यांचे काय होईल, असा प्रश्न होबळे यांनी केला. दरम्यान, येत्या दि. १२ रोजी फोंडा येथे आयोजित केलेला भंडारी समाजाचा महामेळावा पुढे ढकला असून तो आता दि. १९ रोजी होईल, अशी माहिती होबळे यांनी दिली.