ब्लास्टर्सचा हरवून बंगळुरू फॉर्मात

0
104
Bengaluru FC players celebrates a goal during match 36 of the Hero Indian Super League between Kerala Blasters FC and Bengaluru FC held at the Jawaharlal Nehru Stadium,Kochi India on the 31st December 2017 Photo by: Vipin Pawar / ISL / SPORTZPICS

बेंगळुरू एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी केरला ब्लास्टर्सवर ३-१ असा रोमहर्षक विजय नोंदविला. सामन्यातील शेवटच्या काही मिनिटांत सामन्याचा विजेता ठरला. भरपाई वेळेत मिकूने (९० + ३ व ९० + ४ मिनिट) दोन गोल करीत बंगळुरूचा मोठा विजय साकार केला. कर्णधार सुनील छेत्रीने (६०वे मिनिट, पेनल्टी) खाते उघडले.

आधीचे दोन सामने गमावल्यामुळे बंगळुरूवर दडपण आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी फॉर्म मिळविला. बंगळुरूने आठ सामन्यांत पाचवा विजय संपादन केला. त्यांचे १५ गुण झाले. त्यांनी मुंबई सिटी एफसी (१३) व एफसी गोवा (१२) यांना मागे टाकले. एफसी पुणे सिटीचे दुसरे स्थान सरस गोलफरकामुळे कायम राहिले. पुणे आणि बंगळुरूने प्रत्येकी १७ गोल केले आहेत, पण पुण्याविरुद्ध नऊ, तर बेंगळुरूविरुद्ध दहा गोल झाले आहेत. यामुळे पुण्याचा ८ असा गोलफरक बेंगळुरुच्या ७ गोलफरकापेक्षा सरस ठरला. ब्लास्टर्सला सात सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यांनी चार बरोबरी साधल्या आहेत. सात सामन्यांतून सात गुणांसह हा संघ आठव्या स्थानावर आहे.