ब्राझील अंतिम आठात

0
133

स्ट्रायकर ब्रेनरने नोंेदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर कोचीतील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात ब्राझीलने होंडुरासचा ३-० असा एकतर्फी पराभव करीत फिफा अंडर-१७ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम आठ संघात आपले स्थान निश्‍चित केले.

पहिल्या सत्रात ब्राझीलने २-० अशी आघाडी घेतली होती. ऍलानकडून मिळालेल्या क्रॉसवर ब्रेनरने ११व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते खोलणारा हा गोल नोंदविला. ३३व्या मिनिटाला मध्य अमेरिकन संघ होंडुरासला बरोबरीची संधी चालून आली होती. परंतु त्यांच्या लुईस पाल्माने घेतलेला जोरकस फटका थोडक्यात गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेला. पहिल्या सत्राच्या अंतिम क्षणात ४४व्या मिनिटाला पावलिन्होच्या अचूक पासवर मार्कोन आंतोनिओने ब्राझीलची आघाडी २-० अशी केली.

दुसर्‍या सत्रात ५६व्या मिनिटला ब्रेनरने स्वतःचा दुसरा व संघाच्या ३-० अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा तिसरा गोल नोंदविला.