Home Featured बोंडला प्राणिसंग्रहालय बंद, वनपालांची चौकशी सुरू

बोंडला प्राणिसंग्रहालय बंद, वनपालांची चौकशी सुरू

0

राज्य सरकारने बोंडला प्राणिसंग्रहालय बंद प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्राणी संग्रहालय बंद प्रकरणामध्ये अभयारण्य प्रमुख तथा वनपाल नवीन कुमार (आयएफएस) यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती काल वनमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वनखात्यात बेशिस्त कारभार खपवून घेतला जाणार नाही. या वन अधिकाऱ्यांबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठविला जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

अभयारण्य बंद काळात या अधिकाऱ्याने एकही दिवस बोंडला अभयारण्याला भेट दिली नाही. या प्राणिसंग्रहालयातील पाच रानमांजरांच्या मृत्यूनंतर प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची कोणतीही माहिती संबंधित मंत्र्याला देण्यात आली नाही, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.