मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल रेल्वेंमध्ये साखळी बॉम्बस्फोटातील सर्व 11 आरोपींची पुराव्यांअभावी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुंबईच्या लोकल रेल्वेंतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असून, आरोपी तुरुंगाबाहेर आले आहेत. त्याला महाराष्ट्र सरकारने हरकत घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात आदेश दिला तर तुरुंगातून बाहेर आलेल्या 11 आरोपींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. सध्यातरी हे आरोपी तुरुंगाबाहेरच असणार आहेत.