बेशिस्त वाहन पार्किंग विरोधात कारवाई सुरू

0
28

येथील वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगमध्ये पार्क करण्यात येणारी दुचाकी वाहने ताब्यात घेण्याची मोहीम कालपासून सुरू केली. येथील वाहतूक पोलिसांना दुचाकी वाहन उचलण्यासाठी पणजी महानगरपालिकेने वाहन आणि कर्मचारी उपलब्ध केले आहेत. नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगमध्ये पार्क करणार्‍या दुचाकी वाहनांच्या विरोधात कारवाईची मोहीम गेले कित्येक महिने बंद होती. आता, वाहतूक पोलीस विभागाने पुन्हा एकदा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत ताब्यात घेण्यात येणार्‍या वाहनांना दंड ठोठावला जातो. दुचाकी वाहनचालकांनी आपले वाहन पार्क करताना काळजी घ्यावी, नो पार्किंग जागेत दुचाकी वाहन पार्क करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.