बेकायदा रेती वाहतूकप्रकरणी वाळपईत ४० ट्रकांवर कारवाई

0
84

वाळपई-होंडा मार्गावर सालेली जंक्शनवर खाण अधिकार्‍यांनी बेकायदेशीर रेती ट्रकांवर काल सकाळी कारवाई केली. सत्तरीत बेकायदेशीरपणे महाराष्ट्रातून रेती आणली जाते. तसेच म्हादई नदीवर रेती उत्खनन करून बेकायदेशीरपणे ट्रक वाहतूक केली जाते. त्याप्रकरणी खाण अधिकार्‍यांनी ४० ट्रकांवर कारवाई केली.
काल सकाळपासून सुमारे दोन तास कारवाई सुरू होती. सत्तरीत म्हादई पट्ट्यात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन केले जात असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. अनेकांचा रेती उत्खननाचा मोठा व्यवसाय असून मोठ्या प्रमाणात रेती उत्खलन करून लाखो रुपये कमविले जातात. म्हादई पट्ट्यात सोनाळ-सावर्डे, खडकी, गुळेली येथे रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हादई पट्टा ही कुणाचीही खाजगी मालमत्ता नसून नैर्सगीक संपत्ती आहे. पण रेती उत्खनन करणारे कोणताही विचार न करता रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात करतात. त्यांच्यावर मामलेदारांमार्फत कारवाई होण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्षच झालेले आहे. खाण खात्याने काल रेतीवाहू ट्रकांवर केलेली कारवाई महत्वाची मानली जाते. रेतीवाहू ट्रकांवर कारवाई केली त्याचप्रमाणे रेती उत्खनन करण्यावर कारवाई करण्याची गरज आहे, अशी चर्चा आहे.