बेकायदा मुले दत्तक घेण्याचे प्रकार थांबवा

0
89

कोरोनामुळे अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. अनेक लहान मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. या अनाथ झालेल्या मुलांना बेकायदेशीर दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच न्यायालयाने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना मुलांना बेकायदेशीर दत्तक घेणार्‍या स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ५ जूनपर्यंत राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार कोरोना साथीच्या काळात देशभरात किमान ३०,०७१ मुले अनाथ झाली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सोमवारी न्यायालयाला दिली.