बेकायदा घरांकडूनही
होणार घरपट्टी वसुली

0
54

>> सरकारकडून परिपत्रक जारी

ग्रामपंचायत क्षेत्रातील खासगी जमिनीत उभारण्यात आलेल्या बेकायदा घरांकडून घरपट्टी वसूल करण्यासाठी त्यांना नोंदणी क्रमांक देण्याविषयीचे परिपत्रक काल पंचायत संचालनालयाकडून जारी करण्यात आले.

पंचायत क्षेत्रातील खासगी जागेत अनेक बेकायदा बांधकामे आहेत. या बांधकामांकडून पंचायतीला काहीच महसूल मिळत नाही. पंचायत आणि पालिका क्षेत्रातील खासगी जमिनीतील बेकायदा घरे व बांधकामांकडून घरपट्टी वसुलीसाठी त्यांना नोंदणी क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्याविषयीचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागला.
पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी दुपारी पंचायत संचालनालयाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत घरपट्टी आणि नोंदणी क्रमांकासाठी आलेली प्रकरणे निकालात काढण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर पंचायत संचालनालयाकडून यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले.