बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांच्यासोबत इतर चौदा जणांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ घेणार्या मंत्र्यांमध्ये साहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. मेवालाल चौधरी यांचाही समावेश होता. त्यामुळे हा मुद्दा राजद व सीपीआय एमएलने उचलून धरला होता. अखेर सरकार स्थापन झाल्याच्या तिसर्याच दिवशी काल गुरुवारी डॉ. चौधरी यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना डॉ. चौधरी यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना कोणताही खटला तेव्हा सिद्ध होतो, जेव्हा तुमच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. माझ्या विरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्ह्याची नोंदही झालेली नाही. मात्र तरीही मी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनीही याप्रकरणी नितीशकुमार व भाजपवर निशाणा साधला होता.