Home बातम्या बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नीतिशकुमार शपथबद्ध

बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नीतिशकुमार शपथबद्ध

0

10 व्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम

26 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज बिहारमध्ये नीतिशकुमार यांनी विक्रमी 10 व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नीतिश यांच्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. नीतिशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.
यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्याव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते.
नव्या सरकारमध्ये एनडीएचा घटक दलात भाजपच्या कोट्यातून सर्वाधिक 17 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जनता दल यूनायटेडमध्ये 15 मंत्री बनले.
कोण-कोण मंत्री बनणार?
नव्या सरकारमध्ये भाजपकडे सभापतीशिवाय 17 मंत्रीपदे तर जेडीयूच्या 15 मंत्री आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टी (राम विलास पासवान) यांचे दोन, तर जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पार्टीचा प्रत्येकी एक आमदार मंत्री बनेल.

नेत्यांची मुले मंत्री

एलजेपी (आर) कोट्यातून संजय पासवान, राजू तिवारी आणि राजीव रंजन सिंह (डेहरी) यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हम पार्टीमधून संतोष सुमन यांनाच मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. संतोष सुमन जीतन राम मांझी यांचा मुलगा आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाकडून उपेंद्र यांचा मुलगा दीपक प्रकाश यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.