Home बातम्या बालिकेवर बलात्कार प्रकरणी नातेवाईकास अटक

बालिकेवर बलात्कार प्रकरणी नातेवाईकास अटक

0

सहा वर्षीय एका बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिच्याच नात्यातील एका वीस वर्षीय युवकास अटक केली. संशयित आपल्या जवळच्या नातेवाईकाकडे रहात होता व तो त्या बालिकेशी चाळे करत होता. या संदर्भात त्याला पालकांनी समजावले मात्र त्याच्यात फरक पडला नव्हता. काल दुपारी त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयितास अटक केली असून बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.