बालाकोट एअर स्ट्राईकचा व्हिडिओ भारतीय हवाई दलाकडून प्रसिद्ध

0
120

भारतीय हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राइकचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये हवाई हल्ल्याची तयारी आणि दहशतवादी तळ नष्ट केल्याची छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हवाई दलप्रमुख राकेश कुमारसिंग भदौरिया यांनी या व्हिडिओबाबत माहिती दिली. भविष्यात पाकच्या बाजूने कोणतीही दहशतवादी कारवाई घडल्यास सरकारच्या योजनेनुसार पाकला योग्य तो प्रतिकार केला जाईल, असेही हवाई दलप्रमुख म्हणाले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारतीय हवाईदलाने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या या कारवाईत दहशतवादी संघटनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
एखादी दहशतवादी घटना घडल्यास सरकारच्या योजनेनुसार पाकिस्तानला उत्तर दिले जाईल. आता आम्हाला राफेल आणि एस-४०० ची प्रतिक्षा असल्याचे भदौरिया म्हणाले.