कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेल्या बारावीच्या परीक्षेबाबत गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काल अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. निकाल लवकरच मार्गदर्शक सूचनांनुसार जाहीर होईल. या निकालाबाबत समाधानी नसणार्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून पुढील काळात घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेला बसण्यास मान्यता दिली जाणार आहे. ही परीक्षा राज्यातील कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणाखाली आल्यानंतर घेतली जाईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.