कर्नाटकात १४ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ

0
62

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. राज्यात आता दि. १४ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत ७ जूनला संपत होती, तत्पूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दि. १४ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर सध्या १५ टक्के असल्याने लॉकडाऊन वाढवणेच उचित ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी सरकारला दिला होता.