Home बातम्या बायणा दरोड्यामागे नोकरच मुख्य सूत्रधार

बायणा दरोड्यामागे नोकरच मुख्य सूत्रधार

0

बायणा-वास्को येथील सागर नायक यांच्या फ्लॅटमधील दरोड्या प्रकरणी अटक केलेल्या सहा संशयित दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर हा त्यांच्याच दुकानात कामाला होता. त्याने आठ महिन्यांपूर्वीच ही नोकरी सोडली होती. तोच या दरोड्याच्या कटामागील सूत्रधार आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. दरम्यान, या सर्व संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.