बाबू कवळेकर यांना चौकशीसाठी समन्स

0
174

गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांना शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मटका प्रकरणी चौकशीसाठी रायबंदर येथील कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी काल समन्स बजावले आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाने कवळेकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी काल गुरूवारी एक नोटीस जारी केली आहे. सदर नोटीस कवळेकर यांच्या केपे येथील निवासस्थानी पाठविण्यात आली होती. त्याठिकाणी कवळेकर नोटीस स्वीकारण्यास उपलब्ध नव्हते. कुटुंबियांनी सुध्दा नोटीस स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्याविरोधीत एसीबीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कवळेकर यांच्या घराची झडती घेतली असताना बुधवारी मोठ्या प्रमाणात मटका स्लिप्स, नोंदवही व इतर मटका साहित्य आढळून आले होते. मटका व्यवसायात कवळेकर गुंतल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.