बाबूश मोन्सेरात यांच्यावर आरोपपत्र दाखल

0
184

गोवा फॉरवर्डचे नेते बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात पणजी महिला पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ही कथित बलात्काराची घटना मे २०१६ मध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलीला गुंगी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माजी मंत्री मोन्सेरात यांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली होती. तसेच अल्पवयीन मुलीच्या सावत्र आईला सुध्दा अटक करून जामिनावर सोडण्यात आले होते. उत्तर भारतातील या अल्पवयीन मुलीला तिची सावत्र आई आणि मावशीने ५० लाख रुपयांना माजी मंत्री मोन्सेरात यांना विकल्याची जबानी अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली होती. त्यानंतर महिला पोलिसांनी मोन्सेरात व सावत्र आईच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.