बाबरी ढॉंचाप्रकरणी ३० रोजी निकाल

0
280

लखनऊचे विशेष सीबीआय न्यायालय येत्या दि. ३० सप्टेंबर रोजी बाबरी ढॉंचा पाडल्याप्रकरणी निकाल देणार आहे. न्यायाधीश एस. के. यादव यांनी निकालाच्या दिवशी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या न्यायालयाला मुदत वाढवून दिली होती. या प्रकरणात एकूण ३२ आरोपी असून त्यात तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजप नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हे आरोपी आहेत. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशीद पाडणार्‍या कार सेवकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला होता.