बांबोळीतील अपघातात दुचाकीचालक जागीच ठार

0
6

बांबोळी येथे कारगाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक रोहन खेडेकर (वाशी-मुंबई) याचे जागीच निधन काल झाले.दरम्यान, तुये येथील आयटीआय केंद्राजवळ दोन दुचाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात पत्रकार निवृत्ती शिरोडकर हे गंभीर जखमी झाले.

बांबोळी येथे कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालत रोहन खेडेकर याचे जागीच निधन झाले. या अपघाताची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला.
तुये येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. त्यात पत्रकार निवृत्ती शिरोडकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. दुसऱ्या वाहनावरील चालक व सहप्रवासी
जखमी झाले.

राज्यात वाहन अपघातांची मालिका सुरूच असून, एप्रिल महिन्यातील 16 दिवसात 20 जणांचा बळी गेला आहे. राज्यात मागील साडेतीन महिन्यांत वाहन अपघातात 100 च्या आसपास बळीची नोंद झाली असून, अनेक जण जखमी झाले आहेत.