बांगलादेशच्या पराभवाची औपचारिकता बाकी

0
111

पाहुण्या अफगाणिस्तानविरुद्ध यजमान बांगलादेशचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. विजयासाठी ३९८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची चौथ्या दिवसअखेर ६ बाद १३६ अशी दयनीय स्थिती झाली आहे. विजयासाठी त्यांना अजून २६२ धावांची आवश्यकता असून त्यांचे केवळ ४ गडी शिल्लक आहे.

तिसर्‍या दिवसाच्या ८ बाद २३७ धावांवरून काल पुढे खेळताना अफगाणिस्तानने २६० धावांपर्यंत मजल मारली. यष्टिरक्षक फलंदाज झाझाय सलग दुसर्‍या डावात अर्धशतकापासून वंचित राहिला. बांगलादेशकडून शाकिबने सर्वाधिक ३ गडी बाद केले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने दुसर्‍या डावांत आपल्या फलंदाजी क्रमात बदल केला. पहिल्या डावातील सलामीवीर सौम्य सरकारऐवजी लिटन दासने डावाची सुरुवात केली. आठव्या स्थानावरील मोसद्देकला तिसर्‍या स्थानावर पाठविण्यात आले. परंतु, या बदलांचा काडीमात्र फायदा संघाला झाला नाही.

खेळपट्टीवर टिकून राहण्याचे धारिष्ट्य एकानेही दाखवली नाही. अफगाण गोलंदाजांनी ठराविक अंतराने गडी बाद करत बांगलादेशवरील दबाव कायम राखला. दिवसअखेर शाकिब (३९) व सरकार (०) ही शेवटची स्पेशलिस्ट जोडी खेळपट्टीवर असून यानंतर शेपटाला सुरूवात होणार आहे.

धावफलक
अफगाणिस्तान पहिला डाव ः सर्वबाद ३४२
बांगलादेश पहिला डाव ः सर्वबाद २०५
अफगाणिस्तान दुसरा डाव ः (८ बाद २३७ वरून) ः अफसर झाझाय नाबाद ४८, यामिन अहमदझाय धावबाद ९, झहीर खान झे. मोमिनूल गो. मिराझ ०, अवांतर ४, एकूण ९०.१ षटकांत सर्वबाद २६०
गोलंदाजी ः शाकिब अल हसन १९-३-५८-३, मेहदी हसन मिराझ १२.१-३-३५-२, ताईजुल इस्लाम २८-६-८६-२, नईम हसन १७-२-६१-२, मोमिनूल हक १०-६-१३-०, मोसद्देक हुसेन ४-१-३-०
बांगलादेश दुसरा डाव ः लिटन दास पायचीत गो. झहीर ९, शदमन इस्लाम पायचीत गो. नबी ४१, मोसद्देक हुसेन झे. असगर गो. झहीर १२, मुश्फिकुर रहीम पायचीत गो. राशिद २३, मोमिनूल हक पायचीत गो. राशिद ३, शाकिब अल हसन नाबाद ३९, महमुदुल्ला झे. इब्राहिम गो. राशिद ७, सौम्य सरकार नाबाद ०, अवांतर २, एकूण ४४.२ षटकांत ६ बाद १३६
गोलंदाजी ः यामिन अहमदझाय ४-१-१४-०, मोहम्मद नबी १७.२-४-३८-१, राशिद खान १३-०-४६-३, झहीर खान १०-०-३६-२