Home बातम्या बांगलादेशचा डावाने विजय

बांगलादेशचा डावाने विजय

0

बांगलादेशने एकमेव कसोटी सामन्यात झिंबाब्वेचा एक डाव व १०६ धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटमधील मागील १५ महिन्यांत मिळविलेला बांगलादेशचा हा पहिलाच विजय ठरला. झिंबाब्वेचा पहिला डाव २६५ धावांत संपवल्यानंतर बांगलादेशने आपला पहिला डाव ६ बाद ५६० धावांवर घोषित करत पहिल्या डावाच्या आधारे २९५ धावांची मोठी आघाडी घेतली होती. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी झिंबाब्वेचा दुसरा डाव १८९ धावांत संपला. नईम हसन (८२-५) व ताईजुल इस्लाम (७८-४) यांनी झिंबाब्वेला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. कर्णधार म्हणून मोमिनूल हक याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. नाबाद २०३ धावा केलेला माजी कर्णधार मुश्फिकुर रहीम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामन्यात ९ बळी घेत ऑफस्पिनर नईम हसन यानेदेखील प्रभाव पाडला.