गोवा विधानसभेच्या एखाद्या आमदाराने सार्वजनिक बसमध्ये बसून प्रवास करीत अधिवेशनाला येण्याची घटना काल अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडली.
सांतआंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी काल विधानसभा अधिवेशनाला येण्यासाठी बांबोळी येथील आपल्या निवासस्थानाकडून पणजी कदंब बस स्थानक असा प्रवास केला. नंतर तेथून भाड्याच्या मोटारसायकलने त्यांनी पर्वरी येथील विधानसभा गाठली. वाघ यांचे कला अकादमीचे अध्यक्षपद तसेच ईएसजीचे उपाध्यक्षपद मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढून घेतल्याने विष्णू वाघ यांच्या दिमतीला असलेल्या गाड्याही त्यांना द्याव्या लागल्या. परिणामी गाडी नसल्याने वाघ यांना सार्वजनिक बस व मोटारसायकल पायलट यांचा आधार घ्यावा लागला.