बनावट कॉल सेंटर चालवणार्‍या सहाजणांना चिंबल येथे अटक

0
15

>> छाप्यात १० लाखांचे साहित्य जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने चिंचवाडा चिंबल येथे बनावट कॉल सेंटर चालवणार्‍या आणि अमेरिकन नागरिकांना फसवणार्‍या सहाजणांना काल अटक केली.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने या बोगस कॉल सेंटरवर घातलेल्या छाप्यात सुमारे १० लाख रुपयांचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. गुजरात आणि नागालँडमधील लोकांकडून हा बनावट कॉल सेंटर चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वैद्यकीय बिल, ऍडव्हान्स, कर्ज इत्यादी मंजूर करण्याच्या बहाण्याने त्यांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी सनम बठारी (२३ वर्षे), आकाश पांचोली (२८ वर्षे), आनंद सेंगयुंग (२६ वर्षे), लैरिम होजाई (१९ वर्षे), थ्रेमो केचिंगबा (२३ वर्षे) आणि हेमरिंग गिरिसा (२२ वर्षे) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.