पोलीस खात्यातील एकाच जागी ठांड मांडून बसलेल्या 68 पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ मुक्त (रिलीव्ह) करणारा आदेश पोलीस मुख्यालयातून काल जारी करण्यात आला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन तेथे पगार घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले जातात. संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रमुखाकडून बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी मुक्त केले जाते. वर्ष 2020 ते 2025 या काळात बदली झालेले सहाशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर, पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षकांनी बदली झालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन जागी त्वरित रुजू होण्याचा आदेश जारी केला होता. त्यानंतर, बदली झालेले अनेक पोलीस कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. तथापि, 68 जणांनी आदेशाचे पालन केले नाही. त्यात चार पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
आता, पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षकांनी त्या 68 पोलीस कर्मचाऱ्यांना मुक्त करणारा आदेश जारी केली.

