बंगळुरूत कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटात एक ठार

0
102

येथील एक चर्चनजीक झालेल्या कमी क्षमतेच्या आयईडी बॉम्ब स्फोटात एक ठार तर एक जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी या घटनेमुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे. नववर्ष जवळ असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अशी घटनांविषयी सर्वसाधारण दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. मृत महिलेचे नाव भवानी असे असून तिच्यावर मल्ल्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते, असे रेड्डी यांनी सांगितले. स्फोटावेळी सदर भाग गजबजलेला होता, असे ते म्हणाले.शहरात सर्वसाधारण दक्षतेचा इशारा देण्यात आला असला तरी आपण जादा पोलीस कुमक व केएसआरपी पलटण मागविली असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्फोटाच्या ठिकाणी श्‍वान पथकासह फॉरेन्सिक तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले.
दरम्यान, चर्च मार्गावरील घटनास्थळी कर्नाटकचे पोलीस महासंचालक एल. पचाऊ दाखल होऊन तपासकामास त्यांनी मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या तसेच केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांच्याशी बोलले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्याची सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना ग्वाही दिली आहे.